Posts

Showing posts from July, 2018

सांक्षी ट्रेक

Image
किल्ले सांक्षी  नाणेघाट ट्रेक झाल्यावर 'ट्रेकक्षितिज' संस्थेला जॉइन करण्यासाठी सांक्षी किल्ल्याचा ट्रेक करण्याचे ठरवले. ट्रेकची सुरवात ५ वाजता होणार होती त्याप्रमाणे ५ वाजता शिवजी महाराजांच्या पुतळ्याकडे जमलो मग तिथून ट्रेकला सुरवात झाली. आमची बस पनवेल-कर्नाळा-पेण  मार्गे  मुंगोशी गावी पोहोचलो. मुंगोशी गाव हे सांक्षी किल्ल्याला जाण्यासाठी बेस विलेज आहे तिथे पोहोचल्यावर सकाळची न्याहारी उरकून घेतली. मग ट्रेकक्षितिजचा टीम लीडर विराट दादाने ओळख परेड घेतली. ओळख परेड झाल्यावर आम्ही सांक्षी किल्ल्यासाठी मार्गस्थ झालो, सुरवातीला एक छोटासा रॉक पैच आहे. ज्यांचा पहिला ट्रेक आहे त्यांना थोडा कठीण  वाटेल पण  माझा हा दहावा ट्रेक असल्यामुळे काही वाटले नाही तसेच ट्रेकक्षितिजच्या लोकांनी रोप पण लावलेले. आम्ही गड माथ्यावर पोहोचलो. आम्ही किल्ल्यावर अवघ्या अर्ध्या तासात पोहोचलो. बाजुलाच पाण्याची टाकी होती. गडफेरी केली. गडावर जास्त अवशेष न्हवते. पाण्याची टाकी होती आणि गुहा होती. आम्ही ग्रुप फोटो घेतला आणि गडाची उतराई करायला सुरवात केली. खाली उतरल्यावर भोजन केले आणि घरी...

नाणेघाट ट्रेक

Image
नाणेघाट ‌सरसगड झाल्यावर 2 आठवडे ट्रेक केला नसल्यामुळे जशी वारकऱ्यांची पावले पंढरीकडे वळतात तशीच आम्हा ट्रेकर्सची पावले सह्याद्रीकडे वळतात म्हणून ह्या वेळेला नाणेघाटात जायचे ठरवले. उन्हाळा असल्यामुळे सकाळी पाचलाच निघालो. ट्रेकचा साथीदार मेहुल ऐरोली वरुन येऊन थांबलेला मग आम्ही नाष्टा करून सकाळी साडे पाचची कल्याण वरुन अहमदनगरला जाणारी बस पकडली. आम्हाला टोकावडेला उतरायचे होते पण मी आळे फाटयाचे तिकीट काढले. मी उत्सुकता म्हणून गूगल मॅप्स काढले आणि झालेला गोंधळ लक्षात आला नाहीतर ट्रेक झालाच नसता कारण आळे फाटा नाणेघाटावरुन ६१ किमी दूर आहे मग आम्ही टोकावडेला  उतरलो. टोकावडेहून नाणेघाट ५ किमी वर आहे पण आम्हाला लिफ्ट मिळाली म्हणून पुढचे कष्ट वाचले. मग आम्ही नाणेघाटाच्या starting point ला पोहोचलो ट्रेक ला  सुरवात करताना उन्हाळा आहे असे वाटलेच नाही कारण सगळीकडे गारवा  होता. वनखात्याने सगळीकडे markings करून ठेवल्याने कुठेही चुकण्याचा प्रश्नच येत नाही. दाट झाडीतून जाताना बरे वाटत होते. सकाळची वेळ असल्याने वातावरण सुद्धा आल्हाददायक होते.  मग क्लीकक्लीकाटाला सुरवात झाली....