सांक्षी ट्रेक

किल्ले सांक्षी 
नाणेघाट ट्रेक झाल्यावर 'ट्रेकक्षितिज' संस्थेला जॉइन करण्यासाठी सांक्षी किल्ल्याचा ट्रेक करण्याचे ठरवले. ट्रेकची सुरवात ५ वाजता होणार होती त्याप्रमाणे ५ वाजता शिवजी महाराजांच्या पुतळ्याकडे जमलो मग तिथून ट्रेकला सुरवात झाली. आमची बस पनवेल-कर्नाळा-पेण  मार्गे  मुंगोशी गावी पोहोचलो. मुंगोशी गाव हे सांक्षी किल्ल्याला जाण्यासाठी बेस विलेज आहे तिथे पोहोचल्यावर सकाळची न्याहारी उरकून घेतली. मग ट्रेकक्षितिजचा टीम लीडर विराट दादाने ओळख परेड घेतली. ओळख परेड झाल्यावर आम्ही सांक्षी किल्ल्यासाठी मार्गस्थ झालो, सुरवातीला एक छोटासा रॉक पैच आहे. ज्यांचा पहिला ट्रेक आहे त्यांना थोडा कठीण  वाटेल पण  माझा हा दहावा ट्रेक असल्यामुळे काही वाटले नाही तसेच ट्रेकक्षितिजच्या लोकांनी रोप पण लावलेले. आम्ही गड माथ्यावर पोहोचलो. आम्ही किल्ल्यावर अवघ्या अर्ध्या तासात पोहोचलो. बाजुलाच पाण्याची टाकी होती. गडफेरी केली. गडावर जास्त अवशेष न्हवते. पाण्याची टाकी होती आणि गुहा होती. आम्ही ग्रुप फोटो घेतला आणि गडाची उतराई करायला सुरवात केली. खाली उतरल्यावर भोजन केले आणि घरी पोचायला बस मधे बसलो. 

सांक्षी किल्ल्याचा ईतिहास:
सांक राजाने हा किल्ला बांधला. त्याला जगमाता नावाची मुलगी होती. राजा कर्नाळ्याच्या लढाईत मारला गेल्यावर त्याच्या मुलीने गडावरून जीव दिला अशी दंतकथा आहे.
इ.स. १५४० मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने हा किल्ला गुजतातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगिजांच्या मदतीने किल्ला परत जिंकून घेतला.निजाम सैन्य परत हल्ला करण्यासाठी येत आहे, ते पाहून किल्ला पोर्तुगिजांच्या हवाली करून गुजरातच्या सुलतान निघून गेला. निजाम सैन्याच्या वारंवार होणार्‍या हल्ल्याला कंटाळून पोर्तुगिजांनी सांकशी व कर्नाळा किल्ला निजामाकडून विकत घेतला.
(माहिती साभार : सदर माहिती ही ट्रेक क्षितिज संस्थेच्या वेबसाइट वरून घेण्यात आलेली आहे.)











नोंदी:
सह्याद्री हा अत्यंत संवेदनशील भाग आहे त्याची काळजी घेणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.
 गड किल्ल्यांवर फिरताना कचरा करू नये आणि कुठेही नावे लिहू नये.
ट्रेकचा खर्च: मी हा ट्रेक ट्रेकक्षितिज संस्थेसोबत केला असल्यामुळे मला ५७५ रुपये खर्च झाला. 
उन्हाळ्यात ट्रेक करत असल्यास सोबत इलेकट्रॉल जरूर बाळगावे.
कोणताही ट्रेक करण्यापूर्वी गूगल मॅपवर तो प्रदेश ऑफलाईन डाउनलोड करावा आणि स्थानिक लोकांचा फोन नंबर घेणे गरजेचे आहे अणि स्थानिक लोकांशी कधीही हुज्जत घालु नये कारण आपत्ती काळात तेच लोक मदतीला येतात. 

Comments