सरसगड ट्रेक
सरसगड गोरखगडाचा ट्रेक झाल्यावर २ - ३ आठवडे ट्रेक न केल्यामुळे जसा माणूस पाण्याशिवाय राहु शकत नाही तसा खरा भटका ट्रेक शिवाय नाही राहू शकत म्हणून ट्रेक करायचे ठरवले . पहिले मी ढाकचा ट्रेक करायचे ठरवले पण कोणी नसल्यामुळे मी तो ट्रेक रद्द केला मग दूधाची तहान ताकावर भागवली आणि सुधागडचा ट्रेक करायचे ठरवले . बरोबर सुरज आणि रविन्द्र पण होते . सकाळची पहिली कर्जत लोकल पकडून बदलापूरला जाऊन थांबलो तिकडे सुरज आणि रविन्द्र भेटले . मग ते दोघे भेटल्यावर खोपोली गाडी पकडली . खोपोलीला गेल्यावर नाष्टा करण्याच्या नादात बस गेली . मग परत कसरत सुरु . खोपोली फाटयापर्यंत टमटम केली . खोपोली फाटयावरुन परळीपर्यंत टमटम केली . परत परळीवरुन पाली पर्यंत टमटम केली . असा सगळा द्रविडी प्राणायाम केल्यावर शेवटी एकदाचे पालीला पोहोचलो . श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक आहे . पाली बस स्थानकात प्रवेश केल्या सरसगडाचे दर्शन होते . मग आम्ही धोंडसे गावात जाणाऱ्या बसची वाट ...